घसा खवखवण्यावर त्वरित करा ‘हे’ उपाय !

हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या राज्यात कुठे कडाक्याची थंडी, कुठे पाऊस, गारपीट तर कुठे दुपारी चांगलं ऊन असं वातावरण आहे. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं प्रमाण वाढतं. घशाची खवखव हे पुढच्या आजारपणाचं लक्षण असतं. घसा खवखवणं हा आजार साधा दिसत असला तरी यामुळे अस्वस्थ व्हायला होतं.

नेहमीचं काम करणं अवघड होतं. वेळीच इलाज सुरू केला तर आजारपण पुढे जात नाही आणि प्रतिकारशक्ती वाढून पुढचा सर्दी-खोकला ताप यापासून बचाव होऊ शकतो. काही घरगुती उपायांनी घसा दुखणे, खवखवणे यावर आराम मिळू शकेल.

सतत चिडचिड होत असेल तर याकडे थोडं लक्ष द्या

१. घशातील खवखव दूर करण्यासाठी तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता. तुळस, लवंग, काळी मिरी आणि आलं घातलेला गरम चहा प्यायल्यास घशाला आराम मिळतो.

२. चहा प्यायला आवडत नसेल तर औषधी काढा करून प्या. नुसत्या काळ्या मिरीचं सेवन केल्यानेही घशाला आराम मिळतो. काळी मिरी, बत्तासा, लवंग, तुळस घालून पाणी उकळवा. पाणी उकळून निम्म्याने कमी झालं की हा काढा पिण्यायोग्य झाला.

३. लसूण खाल्ल्यानेही घशाला आराम मिळतो. लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे घशाचे अनेक आजार दूर होतात. लसणाची एक पाकळी खाल्ली तरी तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो.

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, भाजीपाल्याचे दर घसरले

४. याशिवाय कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या केल्यानेही घशाला आराम मिळतो. लसणीप्रमाणे मिठातही अँटी बॅक्टेरियल गुण असतात. गरम पाण्यामुळे घशाला शेक मिळतो आणि त्रास कमी होतो.

५. हळदीचं दूध प्यायल्याने फक्त घशालाच आऱाम मिळतो असं नाही तर संपूर्ण शरीरासाठी याचा फायदा होतं. निरोगी आरोग्यासाठी हळदीचं दूध नियमितपणे पिणं केव्हाही योग्य.