चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कशा घालवाल? जाणून घ्या त्यासाठीचे घरगुती उपाय

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ही अवस्था जरी कुणाला आवडत नसेल तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. मात्र योग्य वेळी काही उपाययोजना केली तर या समस्येपासून काही प्रमाणात समाधान मिळू शकते.

मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाला सरकारचा ‘ब्रेक’

मात्र, आता तुम्ही कोणतीही चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही फायदेशीर उपचार सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा अधिसारखी सुंदर होईल……

  • अर्धा चमचा दुधावरची साय घेऊन त्यात १०-१२ थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चांगल एकत्र करून घ्या व रोज रात्री झोपतांना चेहऱ्यावर लेप करा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर लेप करण्यापुर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.

आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

  • कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा लवकर सुरकुत्या पडू नये यासाठी चेहऱ्याचा नियमित मसाज करणे खूप फायद्याचे ठरते. अनेकांना प्रश्न पडेल की मसाज कसला करावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी तेलाचा मसाज खूप उपयोगी आहे. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार वेगवेगळे तेल वापरू शकता.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन. याचा लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. यातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणारी बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात. याच्या लेपनामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी कमी करण्यास मदत करतात.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रभागनिहाय तपासणी कॅम्पचे आयोजन करावे – दादाजी भुसे

  • हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची मुळीच गरज नाही.यासाठी फक्त पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवा.सकाळी या बदामांची साले काढून दुधासह बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या.चेहऱ्यावर हे मिश्रण लावून वीस मिनीट चेहरा तसाच ठेऊन नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून काढा.बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
  • पिकलेली केळी व पिकलेली पपई एकत्र करून मिश्रण तयार करा. यामध्ये थोडं मध टाका. एकत्र करून चेहऱ्यावर लेप करावा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. मसाज झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा व कॉटनच्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसावा. हा लेप आठवड्यातुन ३ वेळा करावा.

महत्वाच्या बातम्या –

सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा – छगन भुजबळ