शेतकरी महिलेची किमया; लॉकडाऊनच्या काळात ३० गुंठ्यात घेतले ५ लाखाचे उत्पन्न

कोरोना विषाणूचा प्रभाव हा संपूर्ण जगात दिसून येत आहे. कोरोनामुळे जगावर महासंकट आलेले आहे. त्यामुळे देशभरात अनेकवेळा लोकडाऊन केले गेले. या लोकडाऊनमध्ये हजारो जनांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ही खालावलेली आहे.भरपूर जणांना भविष्यात आता नेमके काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाला सरकारचा ‘ब्रेक’

मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याच्या मावळ परिसरातील एक महिला शेतकरीने हे लॉकडाऊन ही सक्ती नसून संधी असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. त्या महिलेचे नाव रुपाली नितीन गायकवाड आहे.

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात न्यायालयात जाणार – प्रताप अडसड

रूपाली यांनी आपली शेतामध्ये कलिंगड आणि काकडीचे दुहेरी पीक घेतले. अवघ्या 30 गुंठ्यात त्यांनी तब्बल 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावलेला आहे. मावळ परिसर हा भाताचे पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे इतर कुठलेही  पीक कोणी घेत नाही.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रभागनिहाय तपासणी कॅम्पचे आयोजन करावे – दादाजी भुसे

मात्र, रूपाली यांना कलिंगड विक्रीच्या काळात कोरोनाचे महासंकट आले. विक्रीच्या काळाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्यामध्ये रूपाली यांनी हार मानता लॉकडाऊनलाही त्यांनी एक सक्ती नाही तर संधी म्हणून पाहिले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने संपवलं जीवन; आत्महत्येनंतर होतेय ‘या’ नावाची चर्चा

रुपाली यांनी शेताच्या बांधावर व्यापाऱ्यांना 15 रुपये किलोने कलिंगड विक्री केले. मात्र, त्या हताश झाल्या नाहीत. त्यांनी त्याच क्षेत्रात काकडीचे उत्पन्न घेतले. त्यांना 30 गुंठ्यात महिन्याकाठी दहा टन काकडीचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या त्यांना एका तोडणीला 800 ते 900 किलो काकडी मिळते आहे. महिन्याअखेर दहा टन काकडीचे उत्पन्न होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

रूपाली यांना 30 गुंठ्यात दुहेरी पिक घेतले. त्याला त्यांना 1 लाख रुपये खर्च आला. यामाध्यमातून त्यांनी तब्बल 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. दुहेरी पिक घेतल्याने त्याचा फायदा होतो, असे रूपाली यांनी दाखवून दिले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा – छगन भुजबळ