रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला २४ तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.
हळद घातलेलं दूध का प्यावे आणि काय आहेत त्याचे फायदे, घ्या जाणून …..
धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत, शेण, शिल्लक वैरण, काडीकचरा, पिकांची धसकटे अर्धवट कुजलेली असावीत. जमिनीच्या पृष्ठभागावर गादी वाफा तयार करावा. खड्डा करण्याची गरज नाही.जमिनीवर सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा (पाचट, धसकट इ.) २-३ इंच जाडीचा थर घालावा. त्यामध्ये गांडुळे सोडावीत. नंतर हा गादीवाफा गोणपाटाने झाकून घ्यावा.वाफ्याचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादेत ठेवावे. सामू ६.५ ते ७.५ असावा. ४५ ते ५० टक्के ओलावा असावा.
वाफ्यातील मातीची ढेकळे हाताने फोडावीत व आठवड्यातून एकदा वाफ्यातील कचरा खाली-वर करावा.या पद्धतीने महिना- सव्वा महिन्यात चहाच्या पावडरसारखे खत तयार होईल. हे तयार खत वेगळे करावे.तयार झालेले खत काढण्यापूर्वी गांडुळाच्या वाफ्याला आठ दिवस पाणी घालू नये व खताचे छोटे छोटे ढीग तयार करून ठेवावेत म्हणजे गांडुळे तळाशी जातील.
गांडूळ खत वेगळे करताना शक्यतो कुदळ, टिकाव व फावडे यांचा वापर करू नये. त्यामुळे गांडुळांना इजा पोहचणार नाही.गांडूळ खत वेगळे करावे व न कुजलेले भाग गांडुळांना परत खायला घालावेत.प्रत्येक शेतकरी स्वतच्या गरजेइतके गांडूळ खत तयार करू शकतो. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढतो.
महत्वाच्या बातम्या –
गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत धोरण तयार करावे -आरोग्यमंत्री
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही