हार्मोन असंतुलन, वाढतं प्रदूषण आणि धूळ यामुळे सध्या प्रत्येकाला मुरुमांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. रोजच्या धावपळीच्या जगात आपल्याला त्वेचेची काळजी घेणे शक्य नाही. पण काही पदार्थांच्या सेवनाने मुरुमांची समस्या दूर करू शकतो.
ब्राऊन राइस – ब्राऊन राइसमध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन, मॅग्नेशिअम आणि अँटिऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं. व्हिटॅमिन बी आपल्या शरीरातील अतिरिक्त तणावं कमी करुन हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्याचं काम करतं.
लसूण- लसूण हा एक असा पदार्थ आहे ज्यात नैसर्गिकरित्या ऍलिसिनचं प्रमाण खूप जास्त असतं. ऍलिसिन आपल्या शरीरातील अनेक हानिकारक बॅक्टेरीया नष्ट करुन आपल्या त्वचेला मुरुमांपासून वाचवण्याचं काम करतं.
बडीशेप-निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी बडीशेपचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेवरील सूज कमी होऊन त्वचेतील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकली जातात.
जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे…
ग्रीन टी – ग्रीन टी प्यायल्याने मुरुमांची समस्या कमी होते. याशिवाय ग्रीनच्या वापरलेल्या टी बॅग थंड करुन मुरुमे आलेल्या जागेवर 10-15 मिनिटं लावून ठेवल्यास मुरुमांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
जाणून घ्या तिळाचे फायदे… https://t.co/2MkIr4HpfS
— KrushiNama (@krushinama) January 2, 2020