जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे…

आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. शरीराच्या अनेक समस्या तसेच विविध आजारांवरही डाळिंबाचा ज्यूस गुणकारी ठरतो. तसेच डाळिंबाचा ज्यूस व्हिटॅमिन्सचा एक उत्तम स्त्रोतही आहे.

डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईसोबतच फोलिक अॅसिडही असतं. ब्लड प्रेशर, पचनाच्या समस्या तसेच इतर आजारांनी पीडित असणाऱ्या व्यक्तींसाठी डाळिंबाचा ज्यूस अत्यंत फायदेशीर असतो. डाळिंबाच्या ज्यूसचे दररोज सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते.

शरीराची रोगप्रतिकार शक्ती – वाढवतं डाळिंबामध्ये अॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. डाळिंबाचा ज्यूस शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. तसेच आजारांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतो.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणीसाठी शेवटचे चार दिवस

व्हिटॅमिन सी – दररोज शरीराला आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन सीपेक्षा 40 टक्क्यांनी जास्त व्हिटॅमिन सी असतं. उच्च रक्तदाब आणि इतर हृदय रोगांपासून लढण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक असतं.

लो ब्लड प्रेशर -अनेक संशोधनांतून सिद्ध झाल्यानुसार, डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन केल्याने लो ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यास मदत मिळते. डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही प्रकारचे लो ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतो..

जाणून घ्या दुधी भोपळ्याचे फायदे…..

जन कमी करण्यासाठी फायदेशीर -जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करण्याचा विचार करत असाल तर डाळिंबाचा ज्यूस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. डाळिंबामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं आणि याच्या सेवनाने बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते.