सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत छाटणी झालेल्या बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यंदा जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले असून, चार वर्षांतील ही नीचांकी नोंदणी आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर केवळ १७ हजार ७०७ हेक्टरवरील २७ हजार ८३२ बागांची नोंदणी झाली. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, देवळा, सटाणा, येवला या तालुक्यांमधील द्राक्ष बागांवर यंदा प्रतिकूल हवामानाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत.सप्टेंबर महिन्यातील छाटणी केलेल्या बागांमध्ये फुलोऱ्यातील घडकुज ही समस्या मोठ्या प्रमाणावर झाली, तर ऑक्टोबरमधील छाटणी केलेल्या बागा घड जिरण्यामुळे गेल्या आहेत. त्यात डाऊनीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक बागांतील द्राक्षे निर्यातक्षम गुणवत्तेची राहिलेली नाहीत.
जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे….
दरवर्षी जानेवारीमध्ये काढणीसाठी येणाऱ्या द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे निर्यातीसाठी सुरुवातीला माल कमी होईलच, त्यासह अर्थकारण व रोजगारावर सुरुवातीच्या टप्प्यात फटका बसणार आहे. या सर्व घटकांचा परिणाम निर्यातीसाठीच्या ग्रेपनेट प्रणालीतील नोंदणीवर झाला आहे.
रात्री केस धुवत असाल तर सावधान https://t.co/uCkuLizV7x
— KrushiNama (@krushinama) January 10, 2020