खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर हळूहळू कमी होत असून, ते प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत.

धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत

जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.डिसेंबरच्या सुरुवातीला ही आवक प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटलपर्यंत होती. आवक फक्त जळगाव, भुसावळ, चोपडा भागांतून होत होती. परंतु, नंतर आवक वाढू लागली.

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

अडावद, यावल तालुक्‍यांतील किनगाव येथील बाजारातही आवक वाढली आहे. कांद्याला जळगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. काही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, दर कमी होत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. काढणी सर्वत्र आटोपली आहे. सर्वाधिक उत्पादन साक्री, चोपडा, यावल, भुसावळ व जामनेर भागांत झाले.