राज्यात वाटाण्याचे दर ९०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

बाजारात वाटाण्याला मागील काही दिवसांपासून जेमतेम दर मिळत आहेत. उत्कृष्ट दर्जाचा माल ९०० ते १५०० रुपये दरम्यान प्रतिक्विंटल विकला जात आहे. तर दुय्यम दर्जाच्या मालाला ७०० ते १००० दरम्यानचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; नाशकात नगरसेविकेची पोस्टरबाजी

अकोला बाजारपेठेत मध्य प्रदेशासह राज्यातून दररोज ७० ते ८० क्विंटलपेक्षा अधिक मालाची आवक आहे. बाजारात वाटाण्याच्या दरात सध्या दर कमी झालेले आहेत. आवक वाढल्याने दर कमी आहेत. दुय्यम दर्जाच्या वाटाण्याची विक्री ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दराने होत असतानाच उच्च दर्जाचा वाटाणा ९०० ते १५०० रुपये दराने विकत आहे. किरकोळ बाजारात वाटाणा २५ ते ४० रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहे. चांगल्या मालाची मागणी बाजारात टिकून आहे.

जाणून घ्या; कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी

तर पुणे येथील गुलटेकडी येथील छत्रपती कृषी उत्पन्न बाजार समितीत परराज्यातून वाटाण्याची आवक होत आहे. साधारणपणे पंचवीस ते तीस टेम्पोची आवक सुरू आहे. त्यामुळे वाटाण्याचे दर कायम आहेत. सध्या वाटाण्याचे दर प्रतिक्विंटल २५०० ते ३२०० रुपये दर सुरू आहेत. पुणे बाजार समितीत पुणे विभागातून सासवड, पारनेर या भागातून अत्यंत कमी आवक सुरू आहे. दररोज साधारणपणे या भागातून एक ते दोन टेम्पोची आवक होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.