त्वचा कोरडी पडू नये म्हणून क्रिम, मॉइश्चरायझर लावा. घरातून बाहेर पडताना लोशन नक्की लावा. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रिम उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार किंवा त्वचेला सुट होण्याऱ्या घटकांनुसार क्रिम निवडा.
हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ उत्पादनांचा वापर करावा.
याच्या वापराने त्वचेतील ओलावा कायम राहण्याबरोबरच सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव होण्याबरोबरच चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होण्यासदेखील मदत होते.
रात्री झोपायच्याआधी हाता- पायांना, तळव्यांना खोबरेल तेल लावावे. हिवाळ्यात त्वचा ड्राय होते आणि भेगा पडतात. त्यामुळे अनेकदा अती ड्राय पडलेल्या त्वचेतुन रक्तही येते. त्यामुळे थंडीमध्ये खोबरेल तेल लावावे, ते त्वचेचं संरक्षण करण्यात मदत करते. त्वचेचा मुलायमपणा टिकुन राहतो आणि मऊ राहते.
महत्वाच्या बातम्या –
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत फायदे
शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार- उद्धव ठाकरे
मक्याला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे