Vitamin A | टीम कृषीनामा: शरीर निरोगी ठेवण्यासाठी विटामिन ए खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील अनेक महत्त्वाची काम पूर्ण करण्यासाठी विटामिन ए जीवनसत्वाची गरज असते. डोळे, हृदय, मेंदू आणि फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी विटामिन ए महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे शरीरात माफक प्रमाणात विटामिन ए असणे खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील विटामिन एची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील पदार्थांचा समावेश करू शकतात.
रताळे (Sweet potatoes-Vitamin A Deficiency)
रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आढळून येते. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये 900mcg विटामिन ए आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये बीटा कॅरोटीन देखील माफक प्रमाणात उपलब्ध असते. विटामिनसोबतच यामध्ये पोटॅशियम, विटामिन सी, फायबर आणि आयरन आढळून येते. त्यामुळे रताळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पपई (Papaya-Vitamin A Deficiency)
निरोगी राहण्यासाठी आणि पाचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी पपई खूप फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये विटामिन बी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे शरीरातील विटामिन एची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पपईचा समावेश करू शकतात.
गाजर (Carrot-Vitamin A Deficiency)
गाजराचे सेवन करणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर गाजरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळून येते. विटामिन एसोबतच यामध्ये विटामिन सी, विटामिन के पोटॅशियम आणि आयरन चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे गाजराचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
शरीरातील विटामिन एची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील पदार्थांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील आयरन युक्त फळांचा समावेश करू शकतात.
टरबूज (Watermelon-Iron-Rich Fruits)
टरबूज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, प्रोटीन आणि विटामिन सी आढळून येते. त्याचबरोबर टरबुजाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीर निरोगी राहते. त्यामुळे आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात टरबुजाचा समावेश करू शकतात.
डाळिंब (Pomegranate-Iron-Rich Fruits)
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, जस्त, आणि आयरन आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश करू शकतात.
अननस (Pineapple-Iron-Rich Fruits)
निरोगी राहण्यासाठी अननस उपयुक्त ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, विटामिन सी आणि आयरन आढळून येते. अननसाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्याचबरोबर या फळाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या