देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव; आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

देशात 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. देशात 3 हजार 71 ओमायक्रॉनग्रस्तांची आतापर्यंत रुग्ण आढळले आहेत.  यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात , दिल्लीत आहे, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रातात  876 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे. दिल्लीत 876ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे. गुजरातमध्ये 204 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे.

देशात ओमायक्रॉनचे  आतापर्यंत 3 हजार 71  रुग्ण आढळले आहेत.  महाराष्ट्र-  876, दिल्ली- 513, कर्नाटक- 333, राजस्थान-  291 केरळ-  204, गुजरात-  204, तेलंगाणा- 123, तामिळनाडू- 121, हरियाणा- 114, ओडीसा- 60, उत्तर प्रदेश- 31, आंध्र प्रदेश- 28,पश्चिम बंगाल- 27, गोवा- 19, आसाम –  9, मध्य प्रदेश-  9, उत्तराखंड-  8, मेघालय- 4, अंदमान निकोबार-  3, चंडीगढ- 3, जम्मू कश्मीर- 3, पुद्दुचेरी-  2,हिमाचल प्रदेश- 1, लद्दाख-  1,  मणिपूर- १ आढळले आहेत.