Share

जिल्ह्यात अवकाळी पाऊस; द्राक्ष, डाळिंब, शेवगा व भाजीपालांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ६ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, देवळा तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे.   तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष, डाळिंब, शेवगा व  भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, आघार नांदगाव बुद्रुक या भागांमध्ये अवकाळी पावसाने दणका दिला आहे.

तसेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या  सुरवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  जोरदार पाऊस झाला. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी ,म्हणजेच २७ डिसेंबर ला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –

मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon