वाशीममध्ये पिकांसाठी विमा मंजूर

खरीप हंगामात नुकसान झालेल्या मूग, उडीद या पिकांसाठी कंपनीने विमा मंजूर केला आहे. वाशीम जिल्ह्यातील १० हजार ६१ शेतकऱ्यांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये विमा मंजूर केला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार

त्यामुळे शेतकरी सर्वच पिकांच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. विमा कंपनीकडून मूग, उडीद पिकांसाठी सामुदायिक क्लेम मंजूर करण्यात आला आहे. २७ हजारांवर शेतकऱ्यांनी मूग, उडीद पिकांचा विमा काढला होता. यासाठी ४७ लाख ५७ हजार ४४२ रुपये विमा हप्ता भरण्यात आला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर ‘यासाठी’ केली शिवसेनेसोबत सत्ता स्थापन ?

विमा कंपनीने सामुदायिक स्तरावर या दोन्ही पिकांसाठी क्लेम मंजूर केला. याचा १० हजार ६१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी ८१ लाख ४१ हजार रुपये विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जात आहे.