युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. ही बाब लक्षात घेत युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला. या माध्यमातून या शेतकऱ्याला वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न होत आहे. सतीश सुरेश जोगे  असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत

त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतो. जीवामृताचा वापर करून शेतात संत्रा, पपई, कांदा, बन्सी गहू, हळद, मिरची यासोबतच मेथी, पालक, सांभार, वांगी आदी भाजीपाला पिकाचे तो गत दोन वर्षांपासून उत्पादन घेतो.

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

नैसर्गिक औषधांच्या बळावरच वार्षिक २ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेत असल्याचे सतीश या युवा शेतकºयाने सांगितले. अतिशय जिद्द आणि चिकाटीने नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहे. वर्धा येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात त्याने जीवामृत पद्धतीने लागवड केलेला भाजीपाला ठेवला होता. त्याचा कृषीविभागाद्वारे सन्मानही करण्यात आला.