फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. फणस खाल्याने डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात कमी होतात.
– फणसाच्या सालीपासून निघणारे दूध शरीराच्या सुजलेल्या किंवा दुखापत झलेल्या भागात लावल्यास आराम मिळतो. गुडघ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतात.
– फणसाची पाने स्वच्छ साफ करून सुकवल्यानंतर पानांचे चूर्ण तयार करा. त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात.
– फणसाच्या कोवळ्या पानांना बारीक करून त्यापासून लहान – लहान गोळ्या तयार करा. त्यामुळे गळ्याचे आजार कमी होतात.
जाणून घ्या आर्द्रकचे गुणकारी फायदे
– फणसाच्या बियांच्या पावडरमध्ये मध मिसळून लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात
– तोंड आल्यास फणसाची कच्ची पाने चावून थुंकल्याने तोंडाचे विकार कमी होतात.
– पिकलेले फणस खाल्याणे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात.
– फणसात असलेल्या मॅग्नेशियममुळे हाडं मजबूत होतात.
जाणून घ्या गुळाचे फायदे…. https://t.co/9Lw20qYWdY
— KrushiNama (@krushinama) January 22, 2020