‘कडबा शेती’ वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या शेतीतील शेतकरी लाखो रुपयांची उत्पन्न घेत आहेत. वाडा तालुक्यात ४०० एकरहून अधिक क्षेत्रात कडबा शेती केली जात असून तालुक्यातील १५० शेतकरी ही शेती करत आहेत. खरीप हंगामात भात शेतीचे उत्पन्न घेतल्यानंतर काही शेतकरी रब्बी पिकाचे उत्पन्न घेतात, तर काही भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात.
राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार
मात्र ज्या शेतकऱ्याकडे शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा आहे ते शेतकरी गुरांसाठी लागणारा हिरवा चारा म्हणजे कडब्याची शेती करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेत आहेत. पीक, शिलोत्तर, गारगाई, पिंजाळ, दाभोण यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी मक्याची कडबा शेती केली आहे. १५० शेतकरी ही शेती करत असून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ
तयार झालेला हिरवा चारा पिंजाळ येथील ३५० गायी असलेल्या गोठय़ांना आणि वाडा येथील गोशाळा आणि म्हशींच्या तबेल्यांना पुरवला जातो. हा चारा सव्वा तीन रुपये प्रति किलोने विकला जात आहे. कडब्याचे उत्पन्न घेण्यासाठी एका एकरास १५ हजार रुपये सर्व खर्च येतो. एक एकरात २० टन हिरवा चारा मिळून तो तीन ते सव्वातीन हजार रुपये प्रती टनाने विकला जातो व एका एकरास साठ हजाराचे उत्पन्न मिळते.
जाणून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे… https://t.co/pFrGMeHdsQ
— KrushiNama (@krushinama) January 15, 2020