बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर झाले आहेत. बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.

शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला ६ हजार ९७५ रुपये प्रति क्विंटलचे हमीदर घोषीत केले होते. तथापि, गतवर्षीच्या मुगाची खरेदी संपत आल्यानंतरही बाजारात मुगाचे दर ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलच्या वर कधीच गेले नाहीत. अर्थात संपूर्ण हंगामात किमान हजार रुपये कमी दराने शेतकऱ्यांना मुग विकावा लागला. त्यातही सुरुवातीच्या काळात या शेतमालाचे दर अवघे ४ हजार ८०० ते ५ हजार रुपये प्रति क्विंटलच होते.

विविध आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना गरजा भागविण्यासाठी शेतमालाची विक्री करण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता हंगाम सपंला असताना आणि खरीपाच्या पेरणीची तयारी सुरू असताना बाजार समित्यांत मुगाचे दर ६ हजार  रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

शेतकऱ्यांचे हाल ; कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना!