मराठवाड्यात यंदा २१ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी

खरीप हातचा गेलेल्या मराठवाड्यात आजवर सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र जवळपास १९ लाख १९ हजार हेक्‍टर आहे. तसेच तब्बल २१ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पोषक नसलेल्या वातावरणाचा परिणाम हरभऱ्यावर झाला आहे. यंदा रब्बीवर सुरुवातीपासून संकटाचे ढग कायम आहेत. वातावरणाने त्यामध्ये भर घालण्याचे काम केले आहे.

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

मराठवाड्यात यंदा सर्वसाधारण क्षेत्र १९ लाख १९ हजार हेक्‍टर होते. प्रत्यक्षात २१ लाख ४२३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ७८० हेक्‍टर क्षेत्रासह उस्मानाबादमधील ३ लाख ३३ हजार ८३१ हेक्‍टर, परभणीमधील २ लाख ४७ हजार ५९६, हिंगोलीतील १ लाख ४ हजार १३१, नांदेडमधील २ लाख ३३ हजार ८००, औरंगाबादमधील २ लाख २८ हजार ४१, जालन्यातील २ लाख ७४ हजार ९०५, तर बीडमधील ३ लाख ४४ हजार ३३९ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

ज्वारी काही ठिकाणी वाढीच्या, काही ठिकाणी निसवणीच्या, कणसे लागण्याच्या, तर काही ठिकाणी पोटरीच्या अवस्थेत आहे. तीनही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १५५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झालेल्या गव्हाचे पीक काही ठिकाणी वाढीच्या, फुटवे फुटणे ते कांढी काढण्याच्या अवस्थेत आहे. थंडी कमी असल्याने गव्हाची वाढ समाधानकारक झाली नसून काही ठिकाणी करप्याचाही प्रादुर्भाव आढळून येत आहे.