जाणून घ्या हळदीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे

हळदीचे पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. हळद आरोग्यवर्धक असते हे बहुतेकांना माहिती आहे; पण सकाळी उठून हळदीचे पाणी पिणे अनेक समस्यांमध्ये फायदेशीर असते. सकाळी लवकर उठून हळदीचे पाणी सेवन केल्यास ते मेंदूसाठी खूप फायदेशीर असते.

हळदीचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे घटक व कृती :

 • घटक: अर्धे लिंबू, पाव चमचा हळद, एक ग्लास गरम पाणी, थोडा मध.
 • कृती: एक ग्लास घेऊन त्यात अर्धे लिंबू पिळावे, त्यात हळद आणि गरम पाणी मिसळून चांगल्या प्रकारे मिसळावे. त्यात चवीनुसार मध मिसळावा. हळद काही वेळाने खाली बसते त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी हलवून मग प्यावे.

हळदीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे:

 • कर्करोगविरोधी गुणांनी युक्त
  हळदीमध्ये कुरकुमीन नावाचे रसायन असते. त्याच्यामुळे हळद हे अत्यंत प्रभावी अँटिऑक्सिडंट तयार करते, त्यामुळे शरीरात कर्करोग निर्माण करणार्‍या पेशींशी लढू शकतो.
 • मेंदू तेज होतो
  हळद मेंदूसाठी चांगली असेत; पण सकाळी गरम पाण्यासोबत हळद मिसळून प्यायल्यास मेंदूसाठी चांगले असते. विस्मरणाचा आजार जसे डिमेन्शिआ आणि अल्झायमरमध्येही याचे नियमित सेवन करून त्रास कमी करता येतो.
 • हृदयाचे आरोग्य
  हळदीचे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे रक्त गोठत नाही आणि रक्त साफ होण्यासही मदत होते. त्याशिवाय रक्ताच्या धमन्यांमध्येही रक्त साठत नाही. हळदीचे पाणी प्यायल्याने रक्ताची गुठळी होत नाही.
 • लिव्हरची काळजी
  हळदीचे पाणी विषारी गोष्टींपासून यकृताचे रक्षण करते आणि खराब यकृताच्या पेशी पुन्हा नीट होण्यास मदत होते. त्याशिवाय पित्ताशयाचे काम करण्यास मदत करते. त्यामुळे यकृताचे रक्षण होते. हळदीमध्ये कुरकुमीन नावाचे रसायन असते. त्यामुळे हळदीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
 • पचन चांगले राहते
  अनेक संशोधनांतून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, नियमितपणे हळदीचे सेवन केल्यास पित्त जास्त तयार होते. त्यामुळे सेवन केलेला आहार सहजपणे पचू शकतो. जेवणाचे पचन चांगल्या प्रकारे झाल्यास पोटाविषयीच्या आजारांपासून संरक्षण होते. पचनक्रिया उत्तम राहावी यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात हळदीच्या पाण्याचे सेवन सुरू करावे.
 • शरीराची सूज कमी होते
  हळदीतील कुरकुमीन नावाच्या रसायनामुळे हळद औषधासारखे काम करते आणि  शरीराची सूज कमी करण्यास मदत होते. शरीरावर सूज असली तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. त्याशिवाय कुरकुमीन मुळे सांधेदुखी, सूज दूर करण्यासाठी मदत होते.