डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले फळ म्हणजे करवंद. हे छोट्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. हे करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे. करवंदामध्ये नैसर्गिकररीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो.
करवंदाचे औषधी गुणधर्म
- रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
- करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
- करवंदामध्ये मोठय़ा प्रमाणात सायट्रिक अॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
- सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
- करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
- अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
- आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोडय़ा-थोडय़ा अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
- करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
- करवंदाच्या रसामध्ये मधुरता आणि आम्लता असल्यामुळे अपचन झाले असेल, तर अन्नाचे पचन होण्यासाठी करवंदाचे सरबत थोडय़ा थोडय़ा अंतराने पीत राहावे.
- करवंदे वातशामक असल्यामुळे पोटात गुबारा धरला असेल तर करवंद सेवनाने पोट व आतडय़ांचे आरोग्य चांगले राहून वायूचे मलावाटे निस्सरण होते.
- करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
- करवंदामध्ये नसíगकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये करवंद सेवनाचा लाभ होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.
- गर्भवतीने उलटी, मळमळ, अरुची ही भावना कमी होण्यासाठी व विपुल प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी ऋतूमध्ये मूठभर करवंदे खावीत.
महत्वाच्या बातम्या –
- बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – सुभाष देसाई
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!