बऱ्याच वेळा आपल्याला हार्ट अटॅक येतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. हार्ट अटॅक हा असा आजार आहे जो कोणालाही केव्हाही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ लक्षणे….
- श्वास घेण्यास त्रास होणे आणि थकवा जाणवणे असे झाल्यास शरीराला आरामाची गरज असते. परतु हे लक्षण हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हार्ट अटॅकचे असण्याची शक्यता असू शकते.थकवा आणि श्वास घेण्याचा त्रास जास्त करुन महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
- थोडेसे काम केल्याने खूप थकवा येणे. थकवा आणि कसरत केल्यामुळे दररोज घाम फुटल्यास हे खूप सामान्य आहे, परंतु जर तुम्ही अचानक जास्त काम न करता जास्त प्रमाणात घाम येणे सुरू झाले असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे.
- जेव्हा हार्ट अटॅकची समस्या उद्भवते, तेव्हा अचानक हृदय जोराने धडधडू लागत, यामुळे वेगळ्या प्रकारचे भय निर्माण होते. हार्ट बीटचा प्रवेग हृदयविकाराचा एक धोकादायक लक्षण आहे.
- शरीराचा एखादा अवयव दुखणे अथवा अखडू शकते. यामध्ये कंबर, मान, जबड्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता असते. कधी-कधी हा त्रास शरीराच्या इतर भागांमध्ये सुरु होऊन हृदयापर्यंत जाऊ शकते.
- हार्ट अटॅक येण्याआधी हलके अपचन आणि मळमळ होण्याच्या लक्षणांना दूर्लक्षीत केले जाते. हार्ट अटॅक येण्याची समस्या साधारणपणे मोठ्या व्यक्तींमध्ये बघण्यास मिळते. मोठ्या व्यक्तींमध्ये अपचन होण्याचा त्रास जास्त असतो. पोटात दुखणे, अपचन, उल्टी हे लक्षणे हार्ट अटॅकची असू शकतात.
महत्वाच्या बातम्या –