- एक चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करावी. या पेस्टमध्ये एक चमचा आवळा पावडर व एक चमचा दही मिसळावे. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवावी. नंतर पाण्याने धुवावे.
- तसेच आहारात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास केस जास्त गळतात आणि कोंडा होण्याची समस्या होते. पण आवळ्याचे सेवन केल्याने आणि आवळ्याच्या तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यासोबतच केस दीर्घकाळ काळे आणि दाट राहतात. याचप्रमाणे आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
- आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते. नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.
- तसेच आवळ्यापासून च्यवनप्राश, कँडी, आवळा सुपारी, मोरावळा, लोणचे पाणावले जाते. रोजच्या आहारात याचे सेवन केल्यास पचनाच्या बाबतीतील समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरते. जेवण अगोदर रोज आवळा या फळाचे सेवन करावे त्यामुळे पोटदुखी ,अपचन ,गॅसेस याना त्वरित अराम मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
कृषी सहायकांच्या रिक्त पदांमुळे वाढली कृषी विभागाची कसरत
आता मुख्यमंत्री करणार कोल्हापूरच्या महापुराची पाहणी
बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक
बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक