अवेळी पडणाऱ्या पावसामुळे उमरेड तालुक्यात कपाशी, सोयाबीन, धानपिकांचे खूप नुकसान झाले. तालुक्यात धानाचे क्षेत्र १७५० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ५६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६४७ शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. तसेच तेथील पंचनाम्याचे काम कृषी सहायकांच्या रिक्त पदांमुळे प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. तालुक्यात २४ पैकी फक्त १५ कृषी सहायक कार्यरत आहेत. तसेच संपूर्ण तालुक्यात १९२ एवढे गावे आहेत. जर कृषी सहायकांच्या कामाचे नियोजन केले तर एका कृषी सेवकाकडे १२ ते १५ गावांची जबाबदारी येते.
कृषीसेवक हे शेतकरी आणि कृषी विभागातील दुवा असतात. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, समन्वय घडवून मार्गदर्शनाची जबाबदरी ही कृषीसेवक पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांना शेतकरी आणि कृषी विभागातील दुवा समजतात. कृषी विभागात अन्य पदेही रिक्त आहेत. कार्यालयीन रिक्त पदांमुळे कृषी विभागाला कसरत करावी लागत आहे.
या हंगामात उमरेड तालुक्यात तीनदा सर्व्हेक्षणाचे काम झाले. परंतु ९ पदे रिक्त असल्यामुळे हे कामदेखील अपेक्षेप्रमाणे वेळेत होत नाही. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या काळात मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि अर्थमंत्रीदेखील याच भागातील होते.
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या , तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे
नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ सर्वे करावा – डॉ. अशोक उईके
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणार – प्रतापराव जाधव