‘पुदिना’ वनस्पतीचे काय आहेत रामबाण उपाय घ्या जाणून……

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादि याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो.

आतड्यांचे रोगातही हा उपकारक आहे. तुळशीच्या पानासारखेच, विषारी कीडा चावल्याच्या जागी हिची पाने चोळल्यास, कीडा चावल्यामुळे होणारी आग व कंड कमी होतो.या वनस्पतीचा स्वयंपाकातही वापर होतो. पाणीपुरी, कैरीची चटणी, जलजीरा आदींमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्वयंपाकातील अन्य पदार्थांसाठीही याचा वापर होतो. भारतात, उन्हाळ्यात याचा वापर जास्त करण्यात येतो.

  •  जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.
  • पुदिन्याची पाने तुमचे रक्त शुद्ध करतात. पुदिन्यामध्ये अँटीस्पॅस्मोडिक प्रॉपर्टी आहे. मासिक पाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्याचाही हा एक चांगला उपाय आहे. पुदिन्याचा चहाचा 1 क प गरम बनवून घ्या, जो गर्भशायला शांत करेल.
  • जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून  घेऊन लावा यामुळे जखम लवकर माठेल.
  • पुदिन्याच्या पानांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, ड, ई थोडया प्रमाणात आढळतात. ज्यामुळे शरीराचं संक्रमणापासून आणि सूज येण्यापासून संरक्षण होते.
  • तणावमुक्ती -तणाव आणि चिंतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी ही पुदिन्याच्या पानांच्या चहा उपयुक्त आहे.
  • कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसा सोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.
  • पुदिन्याची पानं सॅलड, चटणी, स्मूदीज आणि पाण्यात ही वापरली जातात.

सौदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग –

जर आपली त्वचा तेलकट असेल तर पुदिन्यापासून बनवलेला फेशियल आपल्यासाठी चांगला ठरेल, दोन मोठे चंमचे पुदिन्याचे वाटण आणि दोन चमचे दही तसेच एक मोठा चमचा ओट मील (ओटचे जाडे भरडे पीठ) यांना मिसळवून याचा जाड लेप बनवा आणि हा लेप १५ मिनिटासाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा करा. आपल्या त्वचेचा तेलकट पणा कमी होईल, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळवून त्याचा चेहऱ्यावर फेशियल सारखा वापर केल्याने त्वचेचा तेलकट पणा कमी होईल तसेच सुरकुत्या कमी होतील आणि आपल्या चेहऱ्याची चमक वाढेल.

महत्वाच्या बातम्या –