जाणून घ्या काय आहेत ठिबक सिंचनाचे फायदे….

जाणून घ्या ठिबक सिंचनाचे फायदे –

 • उत्पादनात 20 ते 200 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
 • कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.
 • ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते.
 • पिके लवकर काढणीला येऊन दुबार पिकाला फायद्याचे ठरते
 • पाण्याची 30 ते 80% बचत होते.
 • वाचलेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी वापर करता येतो.
 • क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिल्यास पिकांचे उत्पादन घेता येते.
 • चढ उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.
 • कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन घेता येते.
 • ठिबक सिंचनाचा वापर केल्याने जमिनीची धूप थांबते.
 • पाणी साठून राहत नाही.
 • ठिबकने द्रवरूप खत देता येऊन शंभर टक्के खताचा वापर होतो.
 • खताच्या खर्चामध्ये 30-35 % बचत होते.
 • पिकांना समप्रमाणात खते देता येतात.
 • पाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसल्याने मजुरी खर्चात बचत होते.

फेसबुक पोस्ट 

महत्वाच्या बातम्या –

पंचगंगा नदीला महापूर ; 85 बंधारे पाण्याखाली

स्वाधार योजने’चा आतापर्यंत ३५ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लाभ – डॉ.सुरेश खाडे

कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली