तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लेबियाटी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. तिच्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते. तुळशीला आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती, धर्म यापलीकडे देखील तुळस आरोग्यास लाभदायक आहे.
जाणून घेऊ तुळशीचे आरोग्यदायी फायदे –
- ताप – अनेक वेळा वातावरणात बदल झाला की काहींना लगेच ताप येतो. अशावेळी, तुळशीच्या पानांचा रस काढावा आणि 1-2 चमचे सेवन करावा त्यामुळे ताप उतरण्यास मदत होते.
- सर्दी – सर्दी झाल्यानंतर अनेक वेळा नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने, सर्दी दूर होऊ शकते.
- डोकेदुखी – अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या असल्यास, अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे डोकेदुखी कमी होते.
- डोळ्यांची समस्या – तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते.
- कमी वयात वयस्कपणा वाढीवर उपाय – तुळशीमधील जीवनसत्वे अ आणि ब हे चांगले एंटी आॅक्सीडेंट नी भरलेले असतात त्यामूळे शरीरास टवटवीत आणि चमकदार ठेवण्यास मदत मिळते. पाण्यासोबत तुळसपानांचा रस घेतल्यास शरीरातील विविध संस्था निटपणे कार्य करतात त्यामूळे शरीरास वृध्दावस्था लवकर येत नाही.
- प्रतिरक्षा करणे – तूळशीला एक संपुर्ण औषधी गुण युक्त मानले जाते. शरीराचे पोषण करून त्यांच्या सर्व प्रतिरक्षकांना जीवन देवून त्यांचे कार्य सूरळीत चालविते. त्यामुळे विविध आजारांशी लढतांना शरीर प्रतिकारशक्ती प्रणाली चांगल्याप्रकारे कार्य करते.
- दातांची काळजी – तुळसपानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने 5,10 मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद आणि इतर ग्रंथांमध्ये यास दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते. दात ठणकत असेल तर चोळून तूळसपाने ठणकेवर ठेवल्यास ठणकेवर आराम मिळतो.
- त्वचेची काळजी – तुळसपानांचा वापर त्वचासंक्रमणावरही होतो. तूळस पानांचा लेप त्वचा संक्रमणावर लावून उन्हात बसल्यास व वाळल्यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फार लाभ मिळतात. स्त्रिया तुळसपानाच्या लेपास उत्तम शरीर माॅश्चरायझर म्हणून वापरतात. स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो. तुळशीच्या पानांनी अंघोळ केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच त्वचेवर संक्रमण होत नाही.
महत्वाच्या बातम्या –
पूरग्रस्त भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वच्छता मोहीम राबवणार