हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो.
महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत किंवा कमी निचऱ्याच्या जमिनीत कंद नासणे हा रोग मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे क्षारयुक्त, पाणथळ, चिबड व कमी निचऱ्याच्या व कडक होणाऱ्या जमिनीत हळद चांगली येत नाही म्हणून अशा जमिनी टाळाव्यात. मध्यम काळी, भुसभुशीत, पीकाचे उत्तम पोषण होईल अशी कसदार गाळाची जमीन निवडावी. अशा जमिनीत हरळी, कुंदा, लव्हाळा यासारखी बहुवर्षिक तणे नसावीत.
रासायनिकदृष्ट्या विम्ल जमिनीत हळदीचे पीक येत नाही. मात्र जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ७ ते ८ असल्यास अशा जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते. चुनखडीयुक्त जमिनीतही हळदीचे पीक वाढते परंतु पिकावर सतत पिवळसरपणा राहतो व सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत राहते.
जास्त पावसाच्या भागातील तांबड्या जमिनी हळदीसाठी चांगल्या असतात. कारण त्या मऊ, भुसभुशीत व निचऱ्याच्या असतात. अशा जमिनीत पाणी व खत व्यवस्थापन चांगले होणे आवश्यक असते. भारी काळ्या जमिनीची पाणीधारणशक्ती जास्त असून निचराशक्ती अगदीच कमी असते. त्यामुळे हळदीचे पीक त्यामध्ये चांगले येत नाही.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ १७ शहरांसह जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन
- जिल्ह्यातील कृषी विमा पॅटर्नमुळे आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
- दिलासादायक बातमी : राज्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आजपासून ते १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन
- चांगली बातमी – ‘या’ जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट!