आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. हिंदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे.
आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. उत्तर व दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं. गुजरातमध्ये पावागड, डांग आणि सापुतारा येथील जंगलात आवळ्याचे वृक्ष मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो.
जाणून घेऊयात आवळा खाण्याचे काय आहेत फायदे –
मधुमेह-
मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. तुम्हाला मधुमेह असेल तर आवळ्याच्या रसात मध मिसळून खाल्याने फायदा होतो.
हृदयाची समस्या-
अवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो
पचनक्रिया-
अन्न पचवण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. गॅस,ऍसिडिटी, आबट ढेकर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो. आवळ्याचा वापर तुमच्या रोजच्या जेवणात करायला हवा. आवळ्याचे लोणचे, जूस, चूर्ण यासारख्या पदार्थामुळे तुम्ही आवळ्याचा समावेश तुमच्या जेवणात करू शकता.
वजन कमी करणे-
आवळा तुमच्या शरीरातील मेंटबॉलिज्म मजबूत करतो यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
हाडे मजबूत करते-
आवळा सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे प्रॉब्लेम यामध्ये अराम मिळतो.
डोळ्यांसाठी गुणकारी-
आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्याने याचा फायदा तुमच्या डोळ्यांना नक्कीच होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस यासारख्या आजारापासून दूर राहता येत.
मासिक पाळीत गुणकारी-
महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता, रक्ताच्या समस्या या सर्व त्रासावर आवळा गुणकारी ठरतो. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात यामुळे फायदा होतो
इन्फेक्शन पासून सुट्टी-
आवळ्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन रोखण्याची ताकद असते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने कोणतेही इन्फेक्शन तुम्हाला होत नाही. अनके त्रासापासून तुम्ही दूर राहता…आवळा तुमच्या शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो यामुळे तुमचं पोट स्वच्छ राहत आणि पोट स्वछ असल्याने तुमचं मनही एकदम फ्रेश राहते.
महत्वाच्या बातम्या –
शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या
पीकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेवराईमध्ये एक तास रास्ता रोको आंदोलन