आतापर्यंत तुम्हाला आवळ्याचे त्वचेला आणि शरीराला होणारे फायदे माहित असतील तुम्हाला आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याचे फायदे माहित आहे काय ? आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे सर्व घटक आजारांपासून आपला बचाव करतात. आवळ्याच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडत असतात. नियमितपणे आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने डोळे चांगले राहतात.
जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे….
आवळ्याचा मुरांबा नियमीतपणे खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. नियमितपणे आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. नियमितपणे मुरांबा खाल्ल्याने हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
आवळ्याचा मुरांबा नियमित खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या येत नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येत नाही. सतत तोंड येत असेल तर आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल. नियमितपणे मुरांबा खाल्ल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने एसिडीटीच्या त्रासापासून पासून मुक्तता मिळते. भूक वाढते आणि पचनशक्ती देखील चांगली होते. एक मोठा चमचा आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने सर्दी, खोकला अशा आजारांमध्ये त्वरित आराम मिळतो. पोट साफ होण्यास मदत होते.
सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’ची चिंता करावी – देवेंद्र फडणवीस https://t.co/C9sru5Vp3r
— KrushiNama (@krushinama) February 9, 2020