Share

दररोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे फायदे जाणून घ्या….

सध्या धकाधकीच्या युगात आपल्याला आरोग्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. तंदुरुस्त असेल तरच तुम्हाला तुमचं काम करता येईल. व्यायामासाठी जास्त वेळ काढता येत नसेल त्यांच्यासाठी दिलासा देणारे संशोधन झाले आहे. यामध्ये फक्त 20 मिनिटं चालल्याने होणाऱ्या फायदे समोर आले आहेत. एवढा वेळ चालल्याने एक दोन नाही तर तब्बल 7 प्रकारच्या कर्करोगापासून माणूस वाचतो.

अनेक आजारांवर गुणकारी टोमॅटो

आठवड्यातून अडीच ते पाच तास चालणं-फिरणं किंवा दीड ते अडीच तास व्यायाम करायला हवा असं संशोधकांनी म्हटलं पाहिजे. म्हणजेच दररोज फक्त 20 मिनिटं चालणंही तुम्हाला कर्करोगापासून वाचवू शकतं. चालणं किंवा सायकल चालवल्याने किडनीच्या कर्करोगाचा त्रास कमी होतो.

याशिवाय लिव्हर, ब्रेस्ट या कॅन्सरचा धोकाही दररोज काही मिनिटे चालल्याने कमी होतो. तसेच महिलांमध्ये गर्भाशय, लिम्फोमा, कोलोन या कर्करोगाचा धोका कमी होतो. थोडावेळ चालणं किंवा सायकल चालवण्यामुळे कर्करोगाचा धोका 10 ते 20 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष सांगतात की, व्यायाम केल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो कारण व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते. जर एखादी व्यक्ती शारिरीकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहते आणि वजनही कमी करते तेव्हा कर्करोगाचा धोका जास्त नसतो.

 

मुख्य बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon