माहित करून घ्या कलिंगड लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान

पुणे – महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात हे पिक उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुघंध असतो. या फळामध्ये चुना , फॉस्फरस ही खनिजे व अ ,ब ,क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.

कलिंगडाची लागवड करण्यासाठी अशी करा पूर्वमशागत

जमीन पूर्वमशागत करून चांगली भुसभुशीत करून घ्यावी आणि २ अगर २” मीटर अंतरावर ट्रक्टरने सरळ सार्या सोडाव्यात आणि सरीच्या एका बाजूस पोटात ६० अगर ९० सें.मी. अंतरावर ओंजळभर उत्तम कुजलेले शेन खत आणि १० ग्राम ट्रायकोर्दर्मा आणि थोडेसे फोरेट मिसळून या मिश्रणाचे ढीग टाकावेत. याच वेळी मुठभर १९:१९:१९ हे मिश्र खत ही त्यात टाकावे आणि या टाकलेल्या ढिगाच्या ठिकाणी कुदळीने कुदळून छोटासा आळे टाईप आकार द्यावा. आणि मग या आळ्यात २”ग्राम कार्बेन्डॅझिम अगर १ ग्राम बाविस्टीनची प्रक्रिया केलेल्या कलिंगडाच्या ३ बिया विखरलेल्या स्थितीत टोकाव्यात आणि हलकेसे पाणी द्यावे.

ठिबक असल्यास अतिउत्तम. दोन तीन पानांवर बिया उगवल्यानंतर काम्जोर्रोप काढून जोमदार अशी एक अगर दोन रोपे ठेवावीत. रूट ट्रेनरमध्ये वाढवलेल्या रोपाद्वारे लागवड केल्यास अतिउत्तम. लागणीच्या वेळी खत दिल्यानंतर १५-२० दिवसांनी पुन्हा १०-१५ ग्राम युरिया, १५ ते २० ग्राम सुफला द्यावा ३ मिली बोरॉन, ३मिलि कॅलसीयम, ३ मिली मोलीनम या सूक्ष्म अन्नाद्रावाची १ लिटर पाण्यातून फवारणी करावी. एकरी ७५० ते ८०० लिटर ग्राम बुटाक्लोर हे तणनाशक १०० लिटर पाण्यातून लागवडीच्या दुसर्या दिवशी फवारावे. त्यानंतर काही तन उगवलेच तर खुरपणी करावी. महिन्यांनी वेलीचे शेंडे खुडावेत. वेळ दान्डांच्या मधल्या भागात वळवावेत. ओलाव्याशी संपर्क येऊ देऊ नये. फळाखाली पाचट अंथरावे. फळे २-३ वेळा हलकेपणाने फिरवावीत. २-३ फळे वाढू द्यावीत. बाकीची काढून टाकावीत.

पाणी व्यवस्थापन

या पिकास नियमित भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे फळे तडकतात व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कोकणातील जांभ्या दगडाच्या जमिनीत सर्वसाधारणपणे २ ते ५ दिवसांनी व मध्यम प्रकाराच्या जमिनीत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. फळे कुजू नयेत म्हणून पाणी देताना फळाशी पाण्याचा संबंध येणार नाही याची दक्षता घ्यावी. फळांच्या वाढीच्या काळात वेलांना पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी.

महत्वाच्या बातम्या –