करटोली – करटोली ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. ही भाजी अनेक पोषकतत्वांनी युक्त असल्याचं सांगितलं जातं. तिच्यात औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी कारल्यासारख्या दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते. या वेलीच्या फळांची भाजी करूनही खातात. या भाजीला गुजरातीमध्ये कंटोळा असंही म्हणतात. चला तर जाणून घेऊ फायदे…
- करटोलीमध्ये फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.
- करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे.
- मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
- करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प असतात.
- करटोली भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे.
महत्वाच्या बातम्या –
- रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक – अशोक चव्हाण
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटास जोरदार पावसाची शक्यता
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान ; महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव
- गुणकारी लवंग; लवंग एक फायदे अनेक…
- कशी करावी कापूस पिकाची लागवड, माहित करून घ्या