Lips Care Tips | ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये ओठ (Lips) खूप महत्त्वाचे असतात. कारण ओठ आपल्या सौंदर्यामध्ये हातभार लावतात. त्यामुळे आपण आपल्या ओठांची काळजी घेण्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब करत असतो. पण तरीही अनेकदा आपल्याला ओठांच्या काळेपणाला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने जो लोक धूम्रपान करतात त्यांचे ओठ काळे होतात. पण अनेकदा महिलांना धूम्रपान न करता देखील ओठांच्या काळेपणाला सामोरे जावे लागते. याचे कारण बदलती जीवनशैली असू शकते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ओठांवरील काळवटपणा कसा दूर करायचा याबद्दल माहिती सांगणार आहोत.

तूप

ओठांवरील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही तूपाचा उपयोग करू शकता. तुपाच्या मदतीने ओठांवरील काळवटपणा तर दूर होईलच, पण त्याचबरोबर तूप रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर शुद्ध तुपाचा नियमित वापर केल्याने ओठांवरील रंग सुधारून ओठ मऊ होऊ लागतील.

काकडीचा रस

ओठांवरील काळपटपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण यामध्ये अँटी ॲक्सीडेंट आणि सिलिका मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. अँटी ॲक्सीडेंट आणि सिलिका ओठांवरील काळवटपणा दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला काकडीचा रस दहा ते पंधरा मिनिटे ओठांवर लावावा लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर हा रस पाण्याने धुवा. हे असे नियमितपणे दिवसातून दोन वेळा केल्यास तुम्हाला तुमच्या ओठांच्या रंगांमध्ये फरक जाणवेल.

कोरफड

कोरफडीच्या नियमित वापराने काळे ओठ पुन्हा नैसर्गिक रंगात बदलले जाऊ शकतात. कोरफडीमध्ये ऑक्सिड आणि इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. हे घटक ओठांवरील काळेपणा दूर करण्यास मदत करतात. कोरफडीच्या मदतीने ओठांवरील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही ओठांवर कधीही कोरफड लावू शकतात. नियमित ओठांवर कोरफड लावल्यास तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी दिसायला लागतील.

ओठांची निगा राखण्यासाठी धुम्रपान टाळावे. कारण धूम्रपणाने ओठ अधिक काळे होतात. त्याचबरोबर ओठांवर सुगंधाच्या आधारावर लीप प्रोडक्ट लावणे टाळा. कारण अनेकदा सुगंधित प्रोडक्ट्स ओठांना हानी पोहोचू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या