Dry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आपल्या सोबत त्वचेच्या कोरडेपणाची (Dry Skin) समस्या घेऊन येतो. हिवाळ्यात थंडीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्याचबरोबर अयोग्य आहार घेतल्यामुळे देखील त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढू शकते. योग्य आहार शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. या महागड्या उत्पादनाच्या वापराने त्वचा फक्त बाहेरून सुधारते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्वचेची आतून काळजी घेण्यासाठी आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

फॅटी मासे

फॅटी मासे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. कारण यामध्ये ओमेगा 3, फॅटी ऍसिड आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. जे आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करू शकतात. परिणामी त्वचा हायड्रेट राहिल्याने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर होते. आठवड्यातून किमान तीन वेळा त्यांचे सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणाची समस्या दूर होऊ शकते.

अंडी

अड्यांना प्रोटीन्सचा खजिना म्हणून ओळखले जाते. कारण त्यामध्ये सल्फर आणि ल्युटीन आणि इतर पोषक घटक योग्य प्रमाणात आढळतात. सल्फर आणि ल्युटीन त्वचेवरील आर्द्रता टिकून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे निरोगी त्वचेसाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करू शकतात.

काजू

काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामध्ये त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी अनेक गुणधर्म आढळतात. त्यामुळे जर तुम्हाला त्वचेवरील कोरडेपणाची समस्या टाळायची असेल, तर तुम्ही दररोज चार ते पाच काजू खाऊ शकतात. नियमित काजूचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेवरील अनेक समस्या कमी होऊ शकते.

अवोकॅडो

अवोकॅडोमध्ये विटामिन ई, विटामिन सी आणि अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म उपलब्ध असतात. त्यामुळे नियमित अवोकॅडोचे सेवन केल्याने त्याच्यावरील कोरडेपणाची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेला मॉइश्चरायस ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अवोकॅडोचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या