आता शेतकरी महिला होणार कापूस खरेदीदार

जिवती – दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यात उत्तम कापून उपक्रम सुरू आहे. ८ हजार ७१२ शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे. उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व त्याचबरोबर जैविक शेती करून आंतपिक म्हणून चवळी, मका, वाल आदी पिके घेणे सुरू झाले. अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत होते. परंतु वर्षेभर शेतात मेहनत करायची व कापूस विक्रीसाठी दलाली, हमाली, काटा व इतर भाडे शेतकऱ्यांनी भरून द्यायचे,असा प्रकार सुरू होता. ही बाब जेव्हा फाऊंडेशनच्या लक्षात आली तेव्हा महिला बचतगटांना एकत्र करून योग्य मार्गदर्शन केले. या मोहिमेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

सावकारी कर्जातून होणारी लुट थांबविण्यासाठी महिला बचत गटांना एकत्र आणून शेतकरी महिलांना कापूस खरेदीदार बनावे व बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनने काही जिनिंगसोबत करार केला. त्यामुळे महिलांनाही कापूस खरेदीदार होता येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास खरेदी विक्रीतून दलाली, हमाली, काटा व इतर भाड्यातून सुटका मिळणार आहे.

कापूस खरेदी ते विक्रीचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले गेले. पहाडावरील महिला शेतकऱ्यांना याबाबत माहिती करून देण्यासाठी इंदिरा एक्जिम सोनुर्ली येथे अभ्यासदौरा काढण्यात आला. यातून महिला शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती मिळाली. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वत: कापूस खरेदी ते विक्री या क्षेत्रात पुढाकार घेऊ शकतात. तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असल्याने अशा मोहिमेची गरज होती.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

उद्धव ठाकरे आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार – चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार- उद्धव ठाकरे