राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

दसरा-दिवाळीच्या दरम्यान साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळे राज्यातील ऊसतोडणी कामगारांची दिवाळीच्या धामधूमीत कारखान्यांवर जायची धावपळ सुरू असते. राज्यात साधारण बारा ते चौदा लाख ऊसतोड कामगार दरवर्षी ऊसतोडणी करण्यासाठी विविध साखर कारखान्यांवर स्थलांतरित होतात. पण मागीलवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले. तर यावर्षी अतिपावसाने उसाचे नुकसान झाले; तर काही ठिकाणी पाऊस नप डल्याने ऊस लागवडी झाल्या नाहीत. याचा परिणाम हा साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर होणार आहे. त्याबरोबरच ऊस टंचाईचा मोठा फटका हा राज्यातील ऊसतोड कामगारांना सहन करावा लागणार आहे.

यावर्षी पावसाळ्यात अगदी सप्टेंबरपर्यत फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे नवीन उसाच्या लागवडी झाल्या नाही. तसेच उसाचा पट्टा असलेल्या सांगली, सातारा, नाशिक आदी भागासह मोठ्या नद्याचा पट्टा असलेल्या भागात जास्त पावसामुळे उसाचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी राज्यभर ऊसटंचाई आहे. दरवर्षी राज्यभरात सरासरी ९०० ते ९५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होत असते. पण यंदा मात्र साडेचारशे ते ५०० लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप होण्याची शक्यता नाही. बरेच साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता असल्याने व ऊसटंचाईमुळे गाळप हंगामही फार दिवस सुरू राहणार नसल्याने कारखान्यांनी उचल देण्यास हात आखडता घेतला. त्यामुळे मजुरांना मिळणारी उचलही दरवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्के कमी झाली आहे.

फक्त ऊसटंचाईमुळे अनेक कारखाने बंद राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मजुरांची संख्या अतिरिक्त होणार आहे. मुकादमांना दिल्या जाणाऱ्या उचलीत साखर कारखान्यांनी हात आखडते घेतले आहेत. त्यामुळे मुकदमही मजुरांना उचल देताना दरवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्केच रक्कम देत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग करणार – डॉ.अनिल बोंडे

पिक नुकसानीचे पंचनामे करा ; शेतकऱ्यांचे एक तास रास्तारोको आंदोलन

‘भाजपा सरकार शेतक-यांपाठोपाठ शिक्षकांच्याही मृत्युचे धनी’

भाजपाचे नेते इमानदार म्हणत असतील तर सर्वांची चौकशी झाली पाहिजे