देशभरात ओमायक्रॉनचं संकट; केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

नवी दिल्ली:   कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.  ओमायक्रॉनचे  (Omicron) संकट अजूनही जगभर वावरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने (Union Ministry of Health and Family Welfare)राज्यांना पत्र पाठवले आहे. केंद्राने या पत्राद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Secretary Rajesh Bhushan) यांच्याकडून पाठवल्या गेलेल्या पत्रात काही सुचना दिल्या आहेत. अनेक राज्यांत ओमायक्रॉन संसर्गासह कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे राज्यांनी कोरोना चाचणी करण्यासाठी २४ तास बूथ उभारणे, या बुथवर रॅपीड अँटीजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच रुग्णांना स्वदेशी बनावटीच्या कीट वापरण्याचा सल्ला दिला आहे.

देशात ओमायक्रॉनचा संसर्ग पसरू नये यासाठी सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी तातडीने ही पाऊले उचलावीत अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. तसेच मृत्यूचा आकडा वाढू नये यासाठी काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –