५५१ गावांपैकी ४४८ गावांना मिळाली जमीनमालकी

जंगल भागाला लागून असलेल्या ५५१ गावांपैकी ४४८ गावांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम अंतर्गत दाखल केलेले सामूहिक वनहक्क दावे जिल्हा समितीने मंजूर केले असून त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या गावांना ५३ हजार ९७८. ४० हेक्टर क्षेत्राची जमीन मालकी मिळाली आहे.

बजाज पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश

ग्राम वनहक्क समित्यांनी ठराव घेतल्यानंतर तहसील, उपविभागीय समिती व जिल्हा समितीकडून तातडीने सकारात्मक पाऊल उचलल्याने सामूहिक वनहक्क दाव्यांचा निपटारा झाल्याची माहिती समित्यांच्या सदस्यांनी केली. ५९१ गावे जंगलाला लागलेले असून या गावांमध्ये ५० एकरपेक्षा अधिक जमीन असल्याने वनहक्क कायद्याच्या नियम ३ अन्वये ग्रामसभेद्वारे समित्या गठित करण्यात आल्या आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला निर्णय रायगड संवर्धनासाठी २० कोटी रुपये

ग्राम वनहक्क समिती व ग्रामसभेच्या संयुक्त चौकशी अहवालानंतर त्रुटी आढळल्याने १०६ दावे प्रलंबित आहेत. छानणी करून ४८५ दाव्यांपैकी ४६९ प्रकरणे जिल्हा समितीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी ४४८ प्रकरणांना मंजुरी मिळाली असून  २१ प्रकरणे प्रलंबित आहेत. मंजूर झालेल्या ४४८ गावांना ५३ हजार ९७८.४० हेक्टर जमिनीची मालकी मिळाली आहे.