कांद्यावर पीएचडी करुन महिलेने मिळवली डॉक्टर पदवी

नाशिकच्या कांद्याचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय असतो केवळ महाराष्ट्राचं नाही तर विदेशात शुद्ध या विषयाची चर्चा होत असते. महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका महिलेने पीएचडी करुन डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे या शेतकऱ्याने नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.

10 वर्षात हे 10 Apps झाले सर्वाधिक डाऊनलोड

उत्तर प्रदेशातील उमरी भवानीपुर गावच्या कुमूद शुक्ल.अलाहाबाद विश्वविद्याल्यात २०१५ ते २०१९ या कालावधीत अ‍ॅग्री बिझनेसमध्ये कांदा या विषयावर प्रबंध सादर केला. त्यासाठी शुक्ल त्यांच्या पतीसोबत नाशिकला आल्या त्यानंतरकुमूद शुक्ल यांनी कांदा क्षेत्राना भेटी दिल्या. पीएचडीसाठी एकमेव शुक्लमँडमचाच विषय कांदा होता. त्यासाठी त्यानी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याची निवड केली होती.

गोंदिया, नागपूर, वर्धामध्ये पावसाने लावली हजेरी

कांदा ह्याविषयावर पाच वर्ष अभ्यास करुन प्रबंध सादर करुन पीएचडीचे प्रमाणपत्र व डॉक्टर पदवी मिळवली. ज्यावेळी कांदा उत्पादक साठे यांनी शुक्ल यांना विचारले, "तुम्ही कांदा हा विषय का घेतला?  तेव्हा कुमूद शुक्ल म्हणाल्या.. कांदा हा प्रत्येकाला लागतो.. भाव कमी झाले की शेतकरी ओरडतो, भाव वाढले की ग्राहक ओरडतो.  माझे पती दुबई व इतरत्र कांद्याची निर्यात करतात, त्यामुळे मला जाणून घ्यायचं होत.सखोल अभ्यास करायाचा होता. म्हणून मी कांदा विषय निवडला असे कुमूद शुक्लयांनी सांगतिले. पुढे कुमूद शुक्लने सांगितलं की, त्या उत्पादक व ग्राहक यांना किफायतशीर दरात दोघांनाही परवडेल अश्या भावात कसा कांदा देता येईल.. या विषयावर कुमुद शुक्ल या अभ्यास करणार आहे.

कांद्यावर पीएचडी करुन महिलेने मिळवली डॉक्टर पदवी कांद्यावर पीएचडी