पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

 चला तर मग जाणून घेऊयात पपईच्या बियांचे शरिराला होणारे फायदे…

  • पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे पपईमध्ये इतर फळांपेक्षा अधिक औषधी गुणधर्म असतात.
  • पपईच्या बिया इन्फेक्शन किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जळजळ, सूज किंवा दुखणं यापासून आराम देण्यास फायदेशीर आहेत.
  • पपईच्या बियांचा वापर फेसवॉश सारखा केला जाऊ शकतो. त्यामुळे चेहरा उजळतो आणि त्वचेवर झालेले इन्फेक्शन सुद्धा दूर होतात. पपईच्या बियांचा पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावावे.
  • पपईच्या बियांच्या सेवनाने किडनीसंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते. याच्या बिया किडनीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. किडनी स्टोन आणि किडनीचे कार्य नीट चालण्यासाठी पपईच्या बियांचे सेवन गुणकारी मानले जाते.
  • कॅन्सरसारख्या रोगापासून बचाव करण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये आयसोथायोसायनेट नावाचे तत्व असते. जे कॅन्सरवर उपचार म्हणून आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते.

महत्वाच्या बातम्या –