नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांची आवक १९३ क्विंटल

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत  डाळिंबांची आवक १९३ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होते.मंगळवारी (ता. ७) डाळिंबांची आवक ३२६ क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ६२५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता. सोमवारी (ता. ६) आवक २५२ क्विंटल झाली.

दर ४०० ते ५२५० प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता. शनिवारी (ता. ४) डाळिंबांची आवक ३०० क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० होता. शुक्रवारी (ता. ३) आवक ३८६ क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ६००० असा दर मिळाला.

सर्वसाधारण दर ४२५० होता. गुरुवारी (ता. २) डाळिंबाची आवक ३०८ क्विंटल झाली. त्यांना ४०० ते ६००० रुपयांचा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४२०० होता. बाजार समितीत डाळिंबाची आवक सर्वसाधारण झाली. गेल्या तीन दिवसात आवक मंदावली असून दर त्यानुसार सर्वसाधारण आहे. बाजारातील आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे दरांत चढ-उतार दिसून आला.