ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘बिंडा’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन

श्री लक्ष्मी एंटरटेनमेंट निर्मित बिंडा या मराठी चित्रपटाचे पोस्टर शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हे प्रकाशन शितलदेवी मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथे करण्यात आले. यावेळी प्रकाशनाला निर्माते विशाल क्षिरसागर, सहनिर्माते भालचंद्र खोसे, रावसाहेब कांबळे, लेखक /दिग्दर्शक बिरा गावडे, कार्यकारी निर्माता विकास क्षिरसागर, प्रोडक्शन मॅनेजर मल्हारी गायकवाड, संगीतकार मोनू अजमेरी आणि गीतकार संगीता फुलावळे, साईनाथ जावळकर, क्रिएटिव्ह दिग्दर्शक केतन पेंडसे, नृत्य दिग्दर्शक राहुल रेड्डी आणि छायाचित्रकार फिरोज कुरेशी, ऐडिटर जहिना कुरेशी, तसेच कलाकार संतोष भोसले, रोहन क्षीरसागर, कृष्णा मगर , प्रसाद बिलोरे , अतुल सातफले आदी कलाकार उपस्थित होते.

Realme 5i भारतीय बाजारात लॉन्च

बिंडा हा सामाजिक विषयावर आधारित चित्रपट असून त्याला प्रेमकथेचा स्पर्श आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस तोडणी कामगाराच्या जीवनात होणाऱ्या घडामोडी, त्यांचे शैक्षणिक हाल, कामगारांचे शारीरिक कष्ट अशा अनेक घटकांना एकत्रित करून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटामध्ये रमेश परदेशी , तेजा देवकर , पूर्वा शिंदे , वर्षा रेवडे , विनिता सोनवणे , रमाकांत सुतार आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

जाणून घ्या किवी खाण्याचे फायदे

बिंडा हा चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या संवेदनांना हात घालून चित्रपट मनात घोळत राहील, ही खात्री आहे. माझ्या बालपणापासून हे जीवन अनुभवत असल्यामुळे त्यांच्या कथा आणि व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून केला असल्याचे मत दिग्दर्शक बिरा जग्गु गावडे यांनी मांडले.

Join WhatsApp

Join Now