साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ

सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

कृष्णा कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून, या कारखान्याने तीन लाख ६२ हजार ६८० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, चार लाख ३३ हजार १७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. खासगी कारखान्यांची संख्या वाढली असल्याने या कारखान्यांकडून गाळपही वाढले आहे.

खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांचा उताऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. थंडीत वाढ झाल्यामुळे साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागल्याने साखरेचे उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीपासून ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे.