घरगुती कामगार महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी बचतगट तयार करा – बच्चू कडू

अकोला – घरगुती कामगार महिला (Women) यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कामगार कल्याण विभाग तसेच सामाजिक- स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून  बचतगट तयार करावे. त्यामाध्यमातून त्यांच्या संघटनातून त्यांच्या विकास व आरोग्यासाठी विविध योजना राबवाव्यात असे निर्देश राज्याचे कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे दिले. अशा प्रकारची योजना राज्यात प्रथम … Read more

कामगारांना ५० किलोपेक्षा जास्त भार वाहू देऊ नये – बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई – विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीरस्वास्थ्याला  व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून 50 किलो वजनापेक्षा जास्त मालाची हाताळणी करू नये, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात  सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना 50 किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला … Read more

सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती गठित करणार – हसन मुश्रीफ

मुंबई – कामगारांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना किमान वेतन असावे यासाठी समिती गठित करून यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देशही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी  दिले. मंत्रालयात कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान … Read more

बांधकाम कामगारांना ७ कोटी ३४ लाख कोटींच्या निधीचे वाटप

मुंबई – इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपांबाबतचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला दिले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या ऑनलाईन सुविधांची आढावा बैठक घेतली, तेव्हा सदर … Read more

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकीत वेतन द्यावे – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी  करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले. … Read more

राज्यातील दीड लाख कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार … Read more

राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड – हसन मुश्रीफ

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या … Read more

स्थलांतरीत ऊसतोड कामगारांना रेशन वरील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीचा लाभ द्यावा – धनंजय मुंडे

बीड  –  अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी आणि अशा पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड जिल्हा दौऱ्यावर … Read more

ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘बिंडा’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन

श्री लक्ष्मी एंटरटेनमेंट निर्मित बिंडा या मराठी चित्रपटाचे पोस्टर शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हे प्रकाशन शितलदेवी मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथे करण्यात आले. यावेळी प्रकाशनाला निर्माते विशाल क्षिरसागर, सहनिर्माते भालचंद्र खोसे, रावसाहेब कांबळे, लेखक /दिग्दर्शक बिरा गावडे, कार्यकारी निर्माता विकास क्षिरसागर, प्रोडक्शन मॅनेजर मल्हारी … Read more

राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

दसरा-दिवाळीच्या दरम्यान साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळे राज्यातील ऊसतोडणी कामगारांची दिवाळीच्या धामधूमीत कारखान्यांवर जायची धावपळ सुरू असते. राज्यात साधारण बारा ते चौदा लाख ऊसतोड कामगार दरवर्षी ऊसतोडणी करण्यासाठी विविध साखर कारखान्यांवर स्थलांतरित होतात. पण मागीलवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले. तर यावर्षी अतिपावसाने उसाचे नुकसान झाले; तर काही ठिकाणी पाऊस नप डल्याने ऊस लागवडी झाल्या नाहीत. … Read more