जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटची हजेरी; पिकांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ८,९ , १० जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely) पडला. तर हवामान अंदाजनुसार आज हि काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता होती. वामान विभागाने दि लेल्या अंदाजनुसार नागपूर जिल्ह्यात आज  अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा (Hailstorm) तडाखा बसला आहे, यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आज दुपारी अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या, तर सावनेर , रामटेक आणि पारशिवानी तालुक्यांना अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढलं आहे. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे,  जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे मोसंबी, गहू संत्रा, आणि हरभरा पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या –