विदेश व्यापार विभागाने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे १० टक्के अनुदान कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका बसल्याने राज्यभरात कालच्या तुलनेत कांद्याचे भाव १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटल कमी झाले आहेत.
कांद्याचे प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव (रुपये/क्विंटल) असे (किमान-कमाल-सरासरी) : कोल्हापूर ७००-१६००-१२००, औरंगाबाद ४००-१६००-१०००, मुंबई १२००-१६००-१४००, सोलापूर १००-१८००-९५०, नागपूर ९००-१३००-१२००, पुणे ७००-१५५०-१४००, येवला ५००-१४००-११५०, नाशिक ४५०-१७००-१३००, लासलगाव ६००-१३५०-११५०, नेवासा ४००-१५००-११००, पिंपळगाव बसवंत ४००-१६००-११०० आदि.