धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत

खरीप कांद्याची लागवड ही जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होत असते. पण नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसामुले खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी ह्या लांबणीवर गेल्या. सुरुवातीला अतिपाऊस झाल्याने अनेक लागवडी व टाकलेली रोपे खराब झाली. लागवडी लांबणीवर गेल्याने कांदा काढणी हंगाम सुद्धा लांबणीवर जाणार हे माहित असताना देखील पावसाने कांदा पीक धोक्यात आले आहे. पण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीला झालेल्या पावसामुळे येवला तालुक्याच्या पूर्व भागात काढणीला आलेल्या खरीप कांद्याच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. पावसाचे पाणी कांद्याच्या वाफ्यांमध्ये अजूनही साचून राहिलेले. त्यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर कंद सडून गेले आहेत. त्यामुळे अपेक्षित उत्पादनापासून शेतकरी मुकणार आहे.

तसेच येवला तालुक्यातील पूर्व भागात कोळगाव, ममदापूर या गावांमध्ये लाल कांदा अजूनही पाण्यात आहे. पण या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न होता टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. पंचमाने करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी पंचमाने करताना कांदा पीकच वगळून टाकले आहे. त्यांना याबाबत शेतकऱ्यांनी विचारले तर पंचनाम्यासाठी मका पिकाचे सांगण्यात आले आहे. मात्र, कांदा पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे कर्मचारी सांगतात.

चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या येवला तालुक्यात उशिराच्या पावसाच्या भिस्तीवर खरीप कांदा लागवडी झाल्या. पण आता कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत, आम्ही कांद्याचे पंचनामे करणार नाही. यानंतर जर पंचनामे करण्याची विनंती केली तर मक्याचे पंचनामे झाल्यानंतर करू, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. अशी माहिती कोळगाव व ममदापूर परिसरातील कांदा उत्पादकांनी दिली. तातडीने पंचनामे करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी या परिसरातील कांदा उत्पादकांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे करणार विठ्ठल-रखुमाईची महापुजा- सूत्र

राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

झाडे लावणे हा स्वर्गात जाण्याचा समृद्धी मार्ग आहे – सुधीर मुनगंटीवार