देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या  4 हजार 461 रुग्णांची नोंद

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

देशात 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. देशात  4 हजार 461 ओमायक्रॉनग्रस्तांची आतापर्यंत रुग्ण आढळले आहेत.  यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात , दिल्लीत आहे, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रातात  1,247 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे.

देशात गेल्या 24 तासात 277 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे, गेल्या २४ तासात देशात 69,959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.   देशात आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 75 हजार 790  कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत  4 लाख 84 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात3 कोटी 45 लाख 70 हजार 131 कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –