……म्हणून जीभ स्वच्छ ठेवा!

आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.

तोंडाच्या अस्वच्छतेमुळे जीभेला संसर्गाची शक्यता असते. या कारणांमुळे मुखदुर्गंधी, हिरड्यातून रक्त येणं यासारखे धोकेही संभवतात. जीभ अस्वच्छ असेल तर स्वादग्रंथींचं कार्य प्रभावित होतं. अन्नाची चव जाणवत नाही.

संसर्गामुळे जीभ काळी पडू लागते. वेळीच दखल घेतली नाही तर यीस्ट इन्फेक्शन संभवतं. जीभ सुजते. स्वच्छतेचा अभाव असेल तर पेरियोडॉटल आजार उद्भवतो. हे सर्व टाळण्यासाठी जीभेच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now